Fri. Jul 30th, 2021

नाशिकचा तरुण कोरोनाबाधितांसाठी ठरतोय प्लाझ्मादूत

नाशिक: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा ही संजीवनी ठरत आहे. मात्र प्लाझ्मादाते कमी असल्याने रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्माचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान मृत्यूशी झुंज देणाऱ्या कोरोनारुग्णांना प्लाझ्मा मिळावा यासाठी नाशिकच्या सटाणा येथील एक तरुण आणि त्याचे मित्र पुढे सरसावले आहेत.

रोहित जाधव असं या तरुणाचं नाव असून त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून एका आठवड्यात तब्बल १ हजार २०० रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे, तर देशभरात ३ हजार प्लाझ्मादात्यांशी संपर्क साधून त्यांची यादी तयार केली आहे.

रोहित जाधवच्या मोठ्या भावाला कोरोनाची लागण झाल्यानंतर डॉक्टरांनी प्लाझ्माची व्यवस्था करण्यास सांगितले होते. मात्र खूप धावपळ करून देखील त्याला प्लाझ्मा मिळाला नाही आणि दुर्दैवाने रोहितच्या भावाचा मृत्यू झाला. त्यामुळे रोहितने प्लाझ्मा मोहीम हाती घेतली आणि पाहता पाहता ही मोहीम केवळ सटाणापूर्ती मर्यादित न राहता देशभरात पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *