Jaimaharashtra news

फक्त एका सेल्फीसाठी तुमचा लाखमोलाचा जीव धोक्यात घालू नका

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

आपला जीव धोक्यात घालून मजा करू नका, असं आवाहन जय महाराष्ट्र आपल्याला सातत्यानं करत आहे.

 

मात्र, तरीही मजेसाठी जीव धोक्यात घातला जात आहे. नाशिकच्या नांदूरमध्यमेश्वर धरणावरील ही दृश्यं आहेत. धरणातून पाणी सोडलं जाते आणि पाण्याचा प्रवाह अगदी

पुलाजवळ आहे. पाण्यानं रुद्रावतार घेतलाय.

 

उसळत्या पाण्याला पाहून आपल्याच अंगावर काटा येईल. मात्र, ही तरुणाई  सेल्फी काढण्यात दंग झाली. पाण्यात सेल्फीसाठी तरुणांची स्टंटबाजी सुरु आहे. 

 

अतिउत्साही नागरिक सेल्फी काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत.  काही जण तर धरणाच्या पुलावर उभं राहून सेल्फी काढण्यासाठी जीव धोक्यात घालताना

दिसत आहेत.

 

यावर पोलिसांनी कठोर कारवाई करत उभं असलेल्या नागरिकांना पिटाळून लावतात. मात्र, पोलिसांनी पाठ फिरताच नागरिक पुन्हा या ठिकाणी सेल्फीसाठी गर्दी

करतात.

 

एकीकडे प्रशासनाच्यावतीने सुरक्षेबाबत सूचना दिल्या जात आहेत. मात्र, नागरिकांनी देखील स्वतःच्या जीवाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.

Exit mobile version