महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशबंदी

अवघ्या काही तासांवर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे. या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर एक निर्णय घेण्यात आला आहे.

पुरोहित संघ आणि मंदिर समिती विश्वस्त यांच्यात आज एक बैठक पार पडली. या बैठकीत हा प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला.

यामुळे आता महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात भाविकांना जाता येणार नाही आहे.

महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा गर्भगृह प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान महाशिवरात्रीला पहाटे 4 ते 7 या वेळेत भाविकांना गर्भगृहात प्रवेश दिला जात होता.

गर्भगृहामध्ये गर्दी होऊन कोणाताही अपप्रकार घडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीच्या अध्यक्षांनी ‘जय महाराष्ट्र’ला दिली

त्र्यंबकेश्वर मंदिरात गेल्या वर्षी महाशिवरात्रीच्या वेळेस भाविकांची गर्दी झाली होती. यामुळे गर्भगृहात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

Exit mobile version