Sat. Jun 12th, 2021

नाशिकच्या वाइनला मिळणार जागतिक ओळख

जगभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या वाइनची दखल केंद्र सरकारने घेतली…

जगभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या वाइनची दखल केंद्र सरकारने घेतली आहे त्यामुळे आता वाइनला नाशिक जिल्ह्याचे उत्पादन म्हणून उद्योग विभागातर्फे घोषित करण्यात आले आहे. येत्या काही काळात वाइन क्षेत्राला बूस्ट मिळू शकेल. यामुळे वाइन क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे आणि नाशिकच्या वाइनला जागतिक ओळखही प्राप्त होणार आहे. वाइनला आता नाशिक जिल्ह्याचे उत्पादन म्हणून उद्योग विभागातर्फे घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे वाईन उद्योगाला चालना मिळेल. भारतात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते त्यामुळे नाशिकला ग्रेप्स सिटी म्हणून ओळखतात. या द्राक्षापासून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाइनची निर्मिती केली जाते. शिवाय केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत उद्योग मंत्रालयाच्या वतीनं ‘वन डिस्टिक वन प्रॉडक्ट’ हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणाऱ्या शेती अथवा औद्योगिक उत्पादनांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठीचे केंद्र सरकाराचे प्रयत्न असणार आहे. यात नाशिकच्या वाइनचा समावेश करण्यात आला आहे आणि यामुळेच नाशिकच्या वाइनची जागतिक पातळीवर ओळख निर्माण होणार आहे.

सरकारकडून वाइन उद्योग निर्मितीसाठी अनुदान दिले जाऊ शकते अशी माहिती मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यात 7 ते 8 वर्षांपूर्वी भारतात सर्वधिक वाइनची निर्मिती केली जातं होती. मात्र योग्य मार्केटिंग न झाल्याने अनेक वाइन उद्योग बंद पडले. सध्या जिल्ह्यात 20 वाइन निर्मिती उद्योग सुरू आहेत. आता सरकारने नाशिकच्या वाइन उद्योगाला चालना देण्यासाठी नवीन योजना आणणे गरजेचं आहे. असं तज्ज्ञांनी मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *