‘तीला’ सेल्फीचा लोभ मोह आवरला नाही आणि हे घडलं …….

सध्या माणसाला सेल्फीचे मोठ्या प्रमाणात वेड लागले आहे. आणि हे वेड माणसाला कधी अडचणीत टाकेल हे सांगता येत नाही. सेल्फी एक माणसाचे व्यसन बनले आहे. यामुळे अनेक घटना घडतात. त्यात अनेकांचे जीवही गेले आहेत. सेल्फीमुळे जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान अशीच एक घटना गुजरात मध्ये घडली आहे. एका महिला सेल्फीच्या लोभामुळे दरीत पडली.

नेमकं काय घडलं ? 

नाशिक मधील एक महिला सापूतारा येथे कुटूंबासह फिरायला आली होती.

तेथे सन राईस पांईटवर लॉरी मल्ला चालवत नैसर्गिक सौंदर्याचे फोटो सेल्फीद्वारे काढत असताना अचानक दरीत पडली.

सुषमा मिलिंद पगारे असे या महिलेचे नाव आहे.

सेल्फी काढताना त्यांचा पाय घसरला आणि त्या दरीत पडल्या. पण सुदैवाने या घटनेत त्यांचा जीव वाचला.

दरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांना जवळच्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

जीव वाचला असला तरी त्या गंभीर जखमी आहेत.

दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Exit mobile version