Wed. Jan 19th, 2022

‘अभिनंदन’वर आक्षेपार्ह कमेंट, थेट ‘रास्ता रोको’ आंदोलन

भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप परतल्यामुळं देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे.

पण दुसरीकडे अभिनंदन यांचं कौतुक करण्यासाठी एका तरुणाने सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

हा तरुण येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील असून अभिनंदन यांचं अभिनंदन करण्यासाठी त्यानं टाकलेल्या पोस्टवर एका समाजकंटकाने विक्षिप्त केलेल्या कमेंटमुळे अंदरसूल येथील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.

त्यामुळे नाराज झालेल्या गावातील काही लोकांनी चौफुले येथे थेट रास्ता रोको केल्याचं वृत्त समोर आलं.

सूत्रांच्या माहितीनुसार अचानक करण्यात आलेल्या या रास्ता-रोकोमुळं वाहतूक करणारे लोक तसंच स्थानिक नागरिकही गोंधळून गेले होते. तसंच यामुळं रस्त्यावर काहीकाळ ट्रफिकही खोळंबली होती.

आंदोलन करण्याचं नेमक कारण काय?

भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानमधून सुखरूप परतल्यामुळं देशभरात उत्साही वातावरण आहे.

अभिनंदन यांचं कौतुक करण्यासाठी अंदरसुल गावातील एका तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली.

तर त्या तरुणाच्या पोस्टवर एका समाजकंटकाने विक्षिप्त कमेंट केली. त्यामुळे गावातील काही लोकांनी तेथे रास्ता रोको आंदोलन केलं.

या आंदोलनामुळं वाहतूक खोळंबून नागरिकांचाही गोंधळ उडाला होता.

कालांतराने तेथील परिस्थीती चिघळत असल्याची महिती नागरिकांकडून स्थानिक पोलिसांना मिळाली.

त्यामुळे स्थानिक पोलिस संपूर्ण फौजफाट्यासह चौफुली येथे पोहचले आणि रास्ता रोको करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थीती काही काळानं वाहतूक सुरळीत सुरू झाली.

यादरम्यान, मनमाड विभागातील पोलिस उपाधीक्षक रामसुधा यांनी प्रकरणाचा तपास केला.

विक्षिप्त टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधला.

त्यामुळे अंदरसुल येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी, सर्व पक्षीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी त्या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पोलिसांनी सदर व्यक्तीविषयी गुन्हा दाखल केला आहे .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *