Wed. Jul 28th, 2021

बहुचर्चित स्मार्ट बस प्रकल्पाला अखेर १ जुलैचा मुहूर्त

नाशिक: गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील बहुचर्चित स्मार्ट बस प्रकल्पाला अखेर १ जुलैचा मुहूर्त मिळाला आहे. मोठ्या दिमाखात आता शहरात या बससेवेची ट्रायल रन घेण्यात येत आहे. प्रवाशांची चढ उतार करत बस शहरात धावल्या मुळे नाशिककर ही खुश झाले आहे. सर्व सोयी सुविधा युक्त आशा बस आहेत. शहरातील पाच मार्गांवर पहिल्या टप्प्यात जवळपास ७० बस धावणार आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या बस सेवेला अखेर मुहूर्त मिळाल्याने सर्वच आनंदात आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प आहे. सर्वपक्षीय विरोधानंतर देखील बससेवेला हिरवा कंदील मिळाला आहे. नाशिकरांचा प्रवास आता सोईस्कर होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *