Sun. May 16th, 2021

कशामुळे नाशिक जिल्हा बँकेचं नुकसान? भूताटकी आणि कब्रिस्तान!

पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही अंधश्रद्धा किती बोकाळली आहे, याचं धक्कादायक उदाहरण नाशिक जिल्हा बँकेच्या निमित्ताने समोर आलं आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थिती खालावलेली आहे. यासाठी चक्क भूताखेतांना जबाबदार धरण्यात येतंय.

काय दिली जात आहेत कारणं?

नाशिक जिल्हा बँकेची जागा झपाटलेली असल्यामुळे ती अशुभ आहे.

कब्रिस्तानाच्या जागेवर ही वास्तू बांधण्यात आल्याने यामध्ये वास्तूदोष आहे.

ही जागा भूताटकीची आहे, असे आरोप होत असल्यामुळे अखेर या बँकेची जागाच हलवण्यात येणार आहे.

सीसीटीव्ही आणि तिजोरीच्या खरेदीसाठीही भुताटकीचं कारण दिलं गेल्याने नाशिक जिल्हा बँक यापूर्वीच वादात सापडली आहे.

बँकेच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीसंदर्भात तर्कशुद्ध कारणमीमांसा करून त्याची उत्तरं शोधणं प्रत्यक्षात गरजेचं आहे.

मात्र नाशिक जिल्हा बँकेच्या संचालक मंडळापासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण भूताटकीचंच कारण पुढे करत आहेत.

त्यामुळेच ही बँक आता CBS येथे हलवण्यात येणार आहे.

यामुळे सुमारे पाच कोटी रुपयांचा फटका यामुळे बँकेला पडणार आहे.

मात्र याचा शास्त्रशुद्ध विचार न करता भूताटकीला दोष देऊन बँक आपल्या कामाचा विचार करण्याऐवजी अंधश्रद्धेच्या आहारी जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *