Tue. Aug 3rd, 2021

बारामतीत कधीच ‘कमळ’ फुलणार नाही  – बारामतीकर

 बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीला महत्त्व आहे.

बारामतीत भाजपाविरोधात पोस्टर लावण्यात आली आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माहेरघर असलेल्या बारामती शहरात ठिकठिकाणी ‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही,

बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही.’ अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत.

बारामती शहरातील प्रशासकीय भवन, नगरपालिका, पंचायत समिती अशा गर्दीच्या ठिकाणी हे पोस्टर्स पाहायला मिळत आहेत.

पोस्टर्सच्या खाली समस्त बारामतीकर असा उल्लेख केला आहे. यामुळे हे पोस्टर्स कोणी लावले आहेत.

याबाबतीत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी  बारामतीत कमळ फुलवणार असे वक्तव्य केले होते.

याच वक्तव्यांचा निषेध बारामतीकरांनी पोस्टर लावून केला आहे.

भाजपाच्या आढावा बैठकीतील विधानांचा पोस्टर्सने निषेध  

  • नुकतंच पुण्यामध्ये भाजपाची आढावा बैठक पार पडली.
  • या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी “बारामतीत कमळ फुलवणार” असे विधान केले होते.
  • भाजप राज्यात 43 जागा जिंकणार आहे.त्यातील 43 वी जागा ही बारामतीची असणार आहे. असे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
  • तर लोकसभेच्या 48 जागांपैकी 45 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. आणि त्यातील एक  जागा बारामतीची हवी असं अमित शहा म्हणाले होते.
  • फडणवीस आणि शहा यांच्या या वक्तव्याचा बारामतीकरांनी पोस्टर बाजीकरून चांगलाच समाचार घेतला आहे.
  • या  धमाकेदार पोस्टर्सची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *