Fri. Jun 5th, 2020

नथुराम गोडसे भारताचे पहिले हिंदू दहशतवादी; कमल हसन यांचे वादग्रस्त विधान

नथुराम गोडसे भारताचे पहिले हिंदू दहशतवादी आहे असे वादग्रस्त वक्तव्य मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी केला आहे. अरवाकुरीमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या प्रचारसभेत बोलताना कमल हसन यांनी वादग्रस्त विधान केले आहे. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हिंदू असून नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना मारले होते असं म्हटलं आहे.

काय म्हणाले कमल हसन ?

ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक कमल यांनी रविवारी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हिंदू होता.

तसेच हा हिंदू दहशतवादी म्हणजे नथुराम गोडसे.

नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांना मारले आहे, असं वादग्रस्त विधान कमल हसन यांनी केले आहे.

कमल हसन यांना तपासण्याची गरज – गिरीश महाजन

कमल हसन यांनी केलेल्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कमळ हसन यांना तपासण्याची गरज आहे.

तसेच हे विधान सकाळी, दुपारी किंवा ‘रात्री’ केलं आहे याची तपासणी करावी लागणार आहे.

त्यांच्या विधानाला तथ्य नसल्याचेही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्यांच्याकडून तपासणी करावी लागणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *