Sun. Sep 19th, 2021

नथुराम गोडसे दहशतवादीच, सिद्ध करून हवं असेल तर कोणत्याही चौकात या- प्रकाश आंबेडकर

देशात नथुराम गोडसेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तामिळ अभिनेते कमल हासन यांनी नथुराम गोडसे हे स्वतंत्र भारतातील पहिले दहशतवादी असून ते हिंदू असल्याचं वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यांना मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या आहेत.

नथुराम गोडसे भारताचे पहिले हिंदू दहशतवादी; कमल हसन यांचे वादग्रस्त विधान

त्याचवेळी भोपाळमधील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि राहतील असं ठणकावून सांगितलं.

नथुराम गोडसे देशभक्त – प्रज्ञासिंह ठाकूर

भाजपने या वक्तव्याबद्दल माफी मागायला लावल्यावर साध्वी प्रज्ञा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

या वक्तव्यावर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मागीतली माफी

मात्र नथुराम गोडसे हे दहशतवादीच असल्याचा दावा वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

नथुराम गोडसे यांच्या देशभक्तीवर आणि दहशवादी असण्याबद्दल सुरू असणाऱ्या वादात प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे हे दहशतवादीच होते, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

कोणाला हे सिद्ध करून हवं असेल तर कोणत्याही चौकात या, असे खुले आव्हानही त्यांनी ‘जय महाराष्ट्र’शी बोलताना केलंय.

भाजपचा नथुराम गोडसेवरील ‘यू टर्न’ हा गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केला असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी भाजपवर केला आहे.

कमल हासनला गांधींकडे पोहोचवण्याची तयारी केली जाईल- हिंदू महासभा

आगामी विधानसभेच्या सर्व जागा जनता दल आणि MIM च्या साथीने आपण लढवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

आता युतीसाठी आपण कुणाकडेही स्वतःहून जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

तसंच पंतप्रधानपदासाठी कुणाला पाठींबा द्यायचा हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट करू, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *