नथुराम गोडसे देशभक्त – प्रज्ञासिंह ठाकूर

मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी मक्कल निधी मय्यम पक्षाचे संस्थापक आणि अभिनेता कमल हासन यांनी नथुराम गोडसे हे स्वातंत्र भारताचे पहिले हिंदू दहशतवादी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कमल हासन यांच्या वक्तव्यावर साधवी ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाली प्रज्ञा सिंह ठाकूर ?

नथुराम गोडसे हे स्वतंत्र भारताचे पहिले हिंदू दहशतवादी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कमल हासन यांनी केले होते.

भोपाळ येथील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी कमल हासन यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे.

नथुराम गोडसे हे देशभक्त होते आणि राहतील असे साधवी ठाकूर यांनी म्हटलं आहे.

जनता अशा लोकांना निवडणुकीत चांगलेच उत्तर देतील असेही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं.

मात्र भाजपाने प्रज्ञासिंह ठाकूर यांना या वक्तव्यावर जाब मागितला असून पाठिंबा देत नसल्याचेही म्हटलं आहे.

Exit mobile version