Mon. Dec 6th, 2021

अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. आपल्या हटक्या अभियनासाठी प्रसिद्ध असलेल्या सुरेखा सिक्री यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना २०२० मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता.
तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना आज सकाळी हृदय विकाराचा झटका आल्याने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्यांना २०२० मध्ये दुसरा स्ट्रोक आला होता, त्यानंतर निर्माण झालेल्या गुंतागुतीमुळे त्यांचे स्वास्थ ठीक नव्हते. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचा परिवार त्यांच्यासोबत होता .

सुरेखा सिक्री या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या. २०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचं निधन झालं.

सुरेखा यांनी आत्तापर्यंत नाटकं, मालिका, चित्रपट सर्वच क्षेत्रात काम केलं. १९७८ सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटविश्वात पदार्पण केलं होतं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या. त्यांना ‘तमस’ (१९८८), ‘मम्मो’ (१९९५) आणि ‘बधाई हो’ (२०१८) या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *