Sun. Oct 17th, 2021

उत्तर प्रदेशात भूकंपाचे  सौम्य धक्के

संपूर्ण उत्तर भारताला आज सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जानवले. भारतीय हवामान खात्याने भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टर स्केल असल्याचे सांगितले आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू ?

उत्तर प्रदेश च्या मुझफ्फरपूर पासून 44 किलोमीटर अंतरावर  असलेल्या दक्षिणेकडील भागात भूकंपाचे धक्के  बसले आहेत.

राजधानी दिल्लीसह,हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील काही शहरांना या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

तब्ब्ल 10 सेकंद भूकंपाचा धक्का जाणवला.

या धक्क्यानंतर लोक घराबाहेर जमा झाले.

भूकंपाची माहिती सोशल मिडियावर वेगाने पसरली.

ट्विटरवरही #earthquake हा ट्रेंड सुरू झाला.

या आधी 12 फेब्रुवारीला बंगालच्या खाडीत 5.1 रिश्टर स्केलचा  भूकंप झाला होता. त्यामुळे तामिळनाडूतील काही भागांनाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. याच बरोबर चेन्नईलाही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *