Sun. May 16th, 2021

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; हिंदीत अंधाधून तर मराठीत भोंगा सर्वोत्कृष्ट चित्रपट

लोकसभा निवडणुकांंमुळे लांबलेल्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे. 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा 24 एप्रिल रोजी होणार होती. मात्र लोकसभा निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आले. ‘अंधाधून’ या हिंदी चित्रपटाला तर ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार –

‘पद्मावत’ चित्रपटातील ‘घुमर’साठी उत्कृष्ट नृत्य निर्देशनाचा पुरस्कार.

अरिजीत सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार.

‘नाळ’ सिनेमातील भूमिकेसाठी श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्तम बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार.

‘पाणी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक सिनेमाचा पुरस्कार.

‘चुंबक’ सिनेमातील भूमिकेसाठी स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार.

संजय लीला भन्साळी यांना ‘पद्मावत’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार.

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा पुरस्कार ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ सिनेमाला.

‘बधाई हो’ या हिंदी सिनेमाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार.

विकी कौशल आणि आयुष्यमान खुराना यांना संयुक्तपणे उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार.

रेड्डी यंकट्टी यांना ‘नाळ’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पणाचा दिग्दर्शनाचा पुरस्कार.

आदित्य धर यांना ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *