Wed. Oct 27th, 2021

अभिनेत्री रश्मिका मंडन्ना आणि अभिनेता विजय देवेराकोंडा हे राष्ट्रीय क्रश म्हणून घोषित

२०२० भारतीय राष्ट्रीय क्रश म्हणून घोषित दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंडन्ना आणि अभिनेता विजय देवेराकोंडा…

दक्षिण भारतीय अभिनेत्री रश्मिका मंडन्ना हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळविली. दक्षिण भारत मधील चित्रपटात रश्मिका उत्कृष्ट अभिनयांचे प्रेक्षकांचे मन जिंकली आहे. चाहत्यांकडून प्रशंसा होत असली तरी अलीकडेच गुगल सर्चमध्ये सर्वाधिक वेळा रश्मिका हिला सर्च केल्या गेलं आहे.

रश्मिका हिला २०२० भारतीय राष्ट्रीय क्रश म्हणून घोषित केले आहे. तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये अभिनय करणारी रश्मिका आताची सर्वाधिक आवडणारी व्यक्तिरेखा बनली आहे. रश्मिकाच्या चाहत्यांनी ट्विटरद्वारे #नॅशनल क्रश रश्मिका ट्रेंड करून त्यांचा उत्साह व्यक्त करतांना दिसत आहे. रश्मिकांनी सुद्धा तिच्या चाहत्यांना रिट्विट केलं आहे.

गीता गोविंदममधील अभिनेता विजय देवरकोंडाच्या अभिनयातून रश्मिका मंडना प्रसिद्धी मिळवली. या दोघांनी ‘डियर कामरेड’ चित्रपटात एकत्र काम केले असून चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूप आवडली.

सध्या रश्मिका सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत तिच्या आगामी पुष्पा या चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. तसेच रश्मिका हेचे ‘डियर कामरेड’ , गीता गोविंदम अशा अनेक चित्रपटात झळकणार आहे.

राष्ट्रीय क्रश ऑफ इंडिया २०२० अभिनेत्यामध्ये विजय देवेराकोंडाने विजेतेपद मिळवले आहे. आपला अर्जुन रेड्डी या चित्रपटाने विक्रम मोडीत काढत विजयने इंडस्ट्रीत सुवर्ण अक्षरांनी आपले नाव रेखांकित केले याद्वारे चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळविली. विजयने डियर कामरेड, टॅक्सीवाला, अर्जुन रेड्डी असे अनेक चित्रपट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *