Sat. Jul 31st, 2021

अभिनंदन यांच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाआरती

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पाकला सुबुद्धी यावी यासाठी महाआरती करण्यात आली आहे. जिनिव्हा करारानुसार त्यांना मुक्त केले पाहिजे मात्र तरीही त्यांना पाकिस्तानने सोडले नसल्यानेही महाआरती करत असल्याचे समजते आहे. या महाआरतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे उपस्थित होते. मात्र आता वैमानिक अभिनंदन यांना उद्या सकाळी सोडणार असे पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले आहे.

महाआरतीत काय झाले ?

महाआरतीला हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि नागरिक- कार्यकर्ते मोठ्या संख्याने सहभागी झाले होते.

या महाआरतीच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी आपल्या हातामध्ये अभिनंदन यांचे छायाचित्र आणि राष्ट्रध्वज घेतला होता.

जवानांच्या सुरक्षेसाठी तुळजाभवानी साकडेही घातले आहे.

तसेच कार्यकर्त्यांनी भारतमाता की जय, वंदे मातरम्, जय जवान… जय किसान अशीही घोषणाबाजी करण्यात आली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *