Tue. Aug 3rd, 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. देशात सात टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका होणार आहे. निवडणुका काही दिवसांतच होत असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात सज्ज झाले आहेत. बुधवारी कॉंग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात २२ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्या यादीत ११ उमेदवार जाहीर केले आहे. तसेच शरद पवार यांनी पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पार्थ पवार यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर केले नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर –

रायगडमधून सुनिल तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सातारातून  उदयनराजे भोसले निवडणुक लढवणार आहेत.
कोल्हापूरमधून धनजंय महाडिक उभे राहणार आहेत.
बुलडाणामधून राजेद्र शिंगणे यांना उमेदवारी दिली आहे.
ठाण्यातून आनंद परांजपे लढणार आहेत.
परभणीतून राजेश विटेकर निवडणुक लढवणार आहेत.
ईशान्य मुंबईतून  संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच कल्याणमधून बाबाजी पाटील लढणार आहेत.
हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना पाठींबा, जळगावमध्ये गुलाबराव देवकर आणि लक्षद्विप – मोहम्मद फैजल यांना उमेदवारी दिली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *