Tue. Aug 9th, 2022

राष्ट्रवादी शिवसेना फोडत होती – एकनाथ शिंदे

राज्यात शिवसेना – भाजपचे सरकार आले असते तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष औषधालाही उरला नसता, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुख्यमंत्री पुणे येथील शेतकरी जनसंवाद या मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी बंड का केले याबद्दलही सांगितले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, अनेकजण म्हणतात, एकनाथ शिंदेनी पाप केले. पण ३०-४० आमदार सातत्याने माझ्याकडे येत होते. त्यांचे दुख: सांगयचे. राष्ट्रवादी कडून होणार त्रास सांगायचे. त्यामुळे राज्य वाचवण्यासाठी आणि राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.

आम्ही जर, बंड केले नसते तर पुढे होणाऱ्या निवडणूकीत शिवसेनेचे बोटावर मोजण्याइतकेच आमदार निवडणून आले असते. सगळे पराभूत झाले असते. मोठ्या प्रमाणात निधी राष्ट्रवादीला मिळत होता. आमचे शिवसैनिक नुसते त्यांच्याकडे पाहत होते. राष्ट्रवादीचे नेते शिवसैनिकांना फोडत होते. त्यांच्या पक्षात जाण्यासाठी आमिष दाखवत होते. त्यामुळे सर्व आमदार आमच्या कडून येऊन आपले दुख: सांगत होते. त्यामुळे, हा निर्णय आम्ही घेतल्याचा एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. ‘अडीच वर्षात काय मिळालं?’ आम्हाला काय मिळाले असेही मुख्यमंत्री म्हणाले.अन्याय किती दिवस सहन करायचा होता. अखेर निर्णय घेतलाच असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.