महागाईविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. इंधनाच्या दरांनी सर्वसामान्यांचे खिसे खाली केले आहेत. सामान्य माणूस या महागाईमुळे होरपळून निघाला आहे. गॅसचे दर वरचेवर वाढत आहेत. मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.१५ टक्के इतका होता. तो महिनाभरात दीड टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. त्यामुळे महागाईने सर्वसामान्यांचं जगणं अवघड झालं आहे. अशा परिस्थितीत महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एल्गार पुकारलाय. २१ मे रोजी राज्यभरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन केलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. सतत वाढणाऱ्या घरगुती गॅस आणि इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हे निषेध आंदोलन करण्यात आले. २०१४साली महागाई कमी करण्याचे आश्वासन देत भाजप सत्तेवर आली. मात्र, महागाई कमी होण्यापेक्षा दुप्पटीने वाढल्याचे चित्र सध्या देशभरात पहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून केंद्रातील सरकारने महागाई कमी करावी अन्यथा सत्तेवरून पायउतार व्हावे अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आली.
hi!,I like your writing very so much! proportion we keep up a correspondence more approximately your post on AOL? I need a specialist in this house to resolve my problem. May be that is you! Having a look ahead to peer you.