Thu. Aug 5th, 2021

‘नटसम्राट’ हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात झळकणार

चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार…

‘नटसम्राट’ हा चित्रपट 27 नोव्हेंबरला पासून पुन्हा एकदा चित्रपटगृहात झळकणार आहे. या कलाकृतींचा कितीही आस्वाद घेतला तरी रंजनाची भूक शमत नाही. अशा कलाकृतींच्या यादीतील ‘नटसम्राट’ या लोकप्रिय चित्रपटाच्या स्मरणरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन पुन्हा एकदा घेता येणार आहे.

कोरोनामुळे गेल्या कित्येक महिने बंद असलेली चित्रपटगृहे अनलॉक अंतर्गत पुन्हा सुरु झाली आहेत. पुन्हा एकदा चित्रपटांचे दिमाखदार पोस्टर चित्रपटगृहांबाहेर झळकताना दिसू लागले आहेत. हळूहळू का होईना प्रेक्षकांची पावले चित्रपटगृहाकडे वळत आहेत. अशावेळी या रसिकप्रिय चित्रपटांचे प्रदर्शन म्हणजे सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सवर नवचैतन्य देण्याचा प्रयत्न ठरणार आहे.

‘नटसम्राट’ हा चित्रपट 1 जानेवारी 2016 रोजी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 35 वर्षांनी रुपेरी पडद्यावर एकत्र आले होते.

‘नटसम्राट’ या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकरांनी यांनी अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारली. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तर विश्वास जोशी, नाना पाटेकर आणि अनिरूद्ध देशपांडे यांनी निर्मिती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *