Sun. Jun 20th, 2021

एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेशासाठी कोरोना अहवाल अनिवार्य

नवी मुंबई: राज्यातील कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीसुद्धा काही ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटने नवीन नियम केला आहे.

सोमवारपासून नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश करताना आपला नेगटीव्ह कोरोना अहवाल सोबत बाळगणे नागरिकांना आवश्यक असणार आहे. त्यामुळे एपीएमसीमध्ये उभारण्यात आलेल्या अँटीजन टेस्ट केंद्रावर एपीएमसीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र आज पहायला मिळत आहे.

या ठिकाणी कोणतेही सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक होण्याची जास्त शक्यता आहे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *