नवी मुंबईतील मेट्रोच्या कामाला गती

नवी मुंबई: नवी मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प मानला जाणारा मेट्रो प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे. सिडकोकडून आगार प्रवेश मार्गावर आणि तळोजा आगारातील चाचणी मार्गावर मेट्रोची चाचणी घेण्यात आली. यावेळी एकूण ८५० मीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो धावली.

सुरक्षिततेच्या कारणास्तव मेट्रोचा वेग कमी ठेवून तो ६५ किलोमीटर प्रती तास इतका ठेवण्यात आला. सिडकोतर्फे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत आहेत.

सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र.१ च्या जलद अंमलबजावणीकरिता महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे आता मेट्रोच्या कामाला गती प्राप्त झाली असून वर्षाअखेरीस मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version