Fri. Sep 24th, 2021

नवी मुंबई महापालिका निवडणूक सहा महिन्यांनी पुढे ढकला- जितेंद्र आव्हाड

नवी मुंबईत अवघ्या काही दिवसांवर महानगर पालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका ६ महिन्यांनी पुढे ढकलाव्यात, असं पत्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी ट्विट केलं आहे.

पत्रात काय म्हटलंय ?

जितेंद्र आव्हाड यांनी हे पत्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन काही शहरांमध्ये सार्वजनिक गर्दीची ठिकाणं तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

नजिकच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नियत वेळी होणार आहेत.

उपरोक्त निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक एकेमेकांच्या संपर्कात येतील.

त्यामुळे या संसर्गजन्य रोगाचा पादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक ६ महिने पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी पत्राद्वारे मुख्य निवडणूक आयुक्तांना केली आहे.

कोरोना व्हायरसने जगात, भारतात आणि राज्यातही थैमान घातलं आहे. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकाडा ३२ पार गेला आहे. राज्यात खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे.

तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात येत आहे.

मुंबईत जमावबंदीचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. मुंबईतील जमावबंदी ३१ मार्च पर्यंत असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *