Fri. Jun 21st, 2019

खलिस्तानी दहशतवाद्यासोबत सिद्धूचा फोटो, विरोधकांकडून टीका

0Shares

पाकिस्तानातील कर्तारपूरमध्ये एका भूमिपूजन कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धू सहभागी झाले होते. कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला जोडणाऱ्या थेट मार्गिकेच्या पायाभरणी समारंभात खलिस्तानी नेता गोपाल चावला हा देखील उपस्थित असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत चावलाने फोटोही काढले असून हे फोटो व्हायरल झाल्यानंतर सिद्धूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अकाली दल व अन्य विरोधी पक्षांनी केली आहे.

या कार्यक्रमात भारतातर्फे नवज्योसिंग सिद्धू, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नवज्योतसिंग सिद्धूंचे भरभरुन कौतुक केले होते. मात्र सिद्धूंचा हा दौराही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात खलिस्तानी नेता गोपाल चावला हा देखील उपस्थित होता. सिद्धूंसोबतचे चावलाचे फोटोही प्रसिद्ध झाले असून यावरुन विरोधी पक्षांनी सिद्धूंवीर जोरदार टीका केली आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: