Sat. Jul 31st, 2021

नवज्योतसिंग सिध्दू यांच्या राजीनाम्यास राज्यपालांची मंजूरी

नवज्योत सिंह सिध्दू यांचा राजीनामा राज्यपालांनी आज मंजूर केला आहे. परस्पर खातं बदलल्यामुळे सिद्धूंनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसचे राजीनामा सत्र सुरूच आहे काही दिवसांपुर्वी काँग्रेसनेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. नवज्योत सिंह सिध्दू यांचा राजीनामा राज्यपालांनी आज मंजूर केला आहे. परस्पर खातं बदलल्यामुळे सिद्धूंनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने देखील त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. परस्पर खातेवाप केल्याने नवज्योत सिंग सिद्धू  नाराज होते. असं ही बोललं जात आहे.

सिद्धूंचा राजीनामा मंजूर

काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.

सिद्धूंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपवला होता.

यादरम्यान मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याचंही बोललं जात होतं.

6 जून रोजी झालेल्या पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत अमरिंदर सिंग यांनी परस्पर खातेवाटप केलं.

यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्याही खात्यात बदल करण्यात आल्याने ते नाराज असल्याचे बोललं जात आहे.

लोकसभा निवडणुकीतील अपयश हे सिद्धूंमुळेच आलं आहे असे आरोपही अमरिंदर सिंग यांनी केले होते.

आज राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *