Tue. Aug 20th, 2019

सिद्धू का म्हणाले मोदींना नवविवाहिता?

0Shares

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप फैरी झडत असताना दिसत आहेत. एकिकडे मोदी – मायावती वाद सुरू आहे तर आता काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू आणि भाजपा मध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नवविवाहितेशी केला आहे. यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. भाजपा म्हणजे ‘काळे इंग्रज’ असून त्यांना सत्तेबाहेर घालवण्यासाठी देश वाचवण्यासाठी मतदान करा असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नवज्योत सिंग सिद्धू

मोदीजी हे नवविवाहितेसारखे आहेत. जी फक्त बांगड्यांचा आवाज करते

त्यामुळे गल्लीतील बाकीच्या लोकांना वाटते. की ती खूप काम करतेय.

गेल्या पाच वर्षांपासून मोदी सरकारच्या काळातही हेच सुरू आहे.

मोदी सरकारने फक्त खोटं बोलण्याचे काम केले आहे.

मोदी सरकार फक्त दिखावा करते आणि प्रत्यक्षात काम काहीच केले जात नाही.

भाजपावर टीका

भाजपा म्हणजे देशातील काळे इंग्रज आहेत.

या इंग्रजांना सत्तेबाहेर घालवण्यासाठी देश वाचवण्यासाठी मतदान करा.

काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.

आता तुम्ही या काळ्यांपासून देशाची मुक्तता करा.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *