Mon. Dec 6th, 2021

पार्थ पवारांचे पबमधील फोटो viral, नवनीत राणा यांचं Trollers ना उत्तर

पार्थ पवारांचे पब मधील फोटो सध्या सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. पार्थ पवार त्यामुळे पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. अशावेळी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी पार्थ यांना पाठिंबा देत trollers ना उत्तर दिलं आहे.

“असे मेसेजेस वायरल करणाऱ्या मध्ये समोर येऊन लढायची हिम्मत नसते. अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यात तीच हिम्मत आहे. म्हणून ते निवडणूक लढवत आहे”, असं वक्तव्य नवनीत कौर राणा यांनी केलं. आज मावळातील लोणावळा येथे पार्थ यांच्या प्रचारासाठी सांगता पदयात्रा काढण्यात आली. यावेळी नवनीत कौर राणा उपस्थित होत्या. त्यावेळी नवनीत राणा यांनी जय महाराष्ट्राशी बातचीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *