Sat. Feb 29th, 2020

अमरावतीत डास नियंत्रणासाठी खासदार नवनीत राणांचीच मोहीम

अमरावती शहरात संतत धार पाऊस सरु असल्याने डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर चक्क खासदार नवनीत राणा यांनी डासांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहेत.

अमरावती शहरात संतत धार पाऊस सरु असल्याने डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. यावर चक्क खासदार नवनीत राणा यांनी डासांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी डासांच्या नियंत्रणासाठी स्वत: धुरळणी केली आहे. त्यांच्या या मोहिमेनंतर महापालिकेला जाग आली आहे.

नवनीत राणा स्वत: डासांच्या नियंत्रणासाठी सज्ज

अमरावती जिल्ह्यात सह शहरात गरल्या 6 दिवसापासून सतत धार पाऊस सुरू आहे त्यामुळे शहरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

पावसामुळे मनपाच्या क्षेत्रामध्ये घाणीचे साम्राज्यामुळे डेंगू, मलेरिया,डायरिया यासारख्या महामारीचे रोग पसरू नये.

याकरिता खा. नवनीत राणा यांनी स्वतः प्रभाग प्रभागात जाऊन पाहणी करून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी साफसफाईचे आणि प्रभाग प्रभागात फॉगिंग मशीनचे अभियान सुरु केले.

नवनीत राणा यांच्या साफसफाई आरोग्य अभियानामुळे मनपाची यंत्रणा जागी झाली आहे.

मनपा अधिकाऱ्यांनी आणि साफ सफाई कंत्राटदारांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये आशा सूचना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *