Thu. Jan 27th, 2022

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात

कोरोनाचं सावट, मंदिरं बंदच

गणपती संपले की ओढ लागते ती नवरात्रीची…. नवरात्री म्हणजेच देवीची उपासना करण्याचे पवित्र नऊ दिवस अश्विन शुद्ध प्रतीपदा ते नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रंगाचे कपडे परिधान केले जातात. नऊ दिवस नऊ रात्री दुर्गा मातेचं पुजन करून तिच्या विविध ९ रूपांची पुजा केली जाते.

नवरात्रोस्तवामध्ये देवीच्या प्रमुख मंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी होते. देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण स्वत:च्या परीने प्रयत्न करतो. कोणी नऊ दिवसांचे उपवास करतात तर कोणी नऊ दिवस चप्पल न घालता उपवास करतात.

महाराष्ट्रासह देशभरातही 17 ऑक्टोबरपासुन म्हणजेच आज नवरात्रोस्तवाला सुरूवात होत आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोस्तव आणि गरबा यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. पण यंदा संपूर्ण जगात कोरोनाचे सावट आहे त्यामुळे सर्वत्र नवरात्रोस्तव साधेपणाने करण्यात येतं आहे. मंदिरं बंद जरी असली तरी काही प्रमुख मंदिरांमध्ये ऑनलाईन पद्धतीने दर्शन देता येणार आहे. तसेच नवरात्रोस्तवात फक्त पुजारी, आणि सेवाक-यांनाच प्रवेश दिला जाणार असुन त्यांच्याच उपस्थित सर्व कार्यक्रम पार पडतील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *