Thu. May 6th, 2021

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा ट्रोल, ‘ट्रोलरला नव्याचं सडेतोड उत्तर

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली ही नेहमीच चर्चेत असते आणि ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेकदा नव्याला ट्रोलर्सना सामना करावा लागतो. नुकतीत नव्याने तिच्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवरून एका युजरने नव्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. मात्र या नेटकऱ्याला नव्याने सडेतोड उत्तर दिलं आहे. देशातील आणि महिलांशी संबंधित अनेक मुद्यांवर ची सोशल मीडियावर तिचं मत मांडत असते. नव्याने तिच्या प्रोजेक्टशी संबंधित एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. नव्या आणि तिच्या संस्थेने गडचिरोलीमध्ये पहिल्या ” Period Positive Home” चं उद्धाटन केलं. शिवाय ही पोस्ट शेअर करत नव्याने आनंद व्यक्त केला आणि अनेकांनी कमेंट करून नव्याचं कौतुक केलं. मात्र एका युजरने नव्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

एका युजरने नव्याच्या पोस्टवर कमेंट करत प्रश्न विचारला, “जर प्रोजेक्ट तुझ्यासाठी इतकाच महत्वाचा होता तर उद्धाटनासाठी तू तिथे का गेली नाहीस?” असं युजरने विचारलं. यावर नव्याने युजरला उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, ” मला असं वाटतं की आपण सर्व एका महामारीचा सामना करत आहोत याची तुम्हाला कल्पना असेल.” असं उत्तर नव्याने दिलं आहे. नव्याच्या या उत्तरावर अनेकांनी तिला पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *