Sat. Nov 27th, 2021

नवाब मलिक यांनी केला केंद्र सरकारवर आरोप महाराष्ट्राला ‘रेमडेसिवीर’ देण्यास केंद्राची बंदी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केली असून केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर औषधावर निर्यात बंदी घातली असा खळबळजनक दावा केला आहे. शिवाय भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत. मात्र, केंद्राच्या भूमिकेमुळे या कंपन्यांना हे औषध बाजारात आणणे कठीण झाले असल्याचं मलिक यांनी सांगितय. राज्य सरकारने १६ निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता, केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. ‘आम्ही हे औषध केंद्राच्या परवानगीशिवाय दिल्यास आमचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली असल्याचं कंपन्यांनी सांगितलं’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

रेमडेसिवीरच्या उत्पादन करणार्‍या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे, असं केंद्र सरकारचे म्हणणे आहे. शिवाय, या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्यानं या औषधाची आवश्यकता आणि उपलब्धता बघता केंद्राने तत्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज असून या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब हे औषध पुरवले जावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात कोरोना स्थिती बघता महाराष्ट्र सरकारकडे या १६ निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा थेट ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही मलिक यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *