Jaimaharashtra news

रेमडिसीविरबाबत मंत्री नवाब मलिक यांचा दावा ठरला खोटा

मंत्री नवाब मलिक यांनी पत्र ट्विट करत केलेला दावा तथ्यहीन सिद्ध झाला आहे. शनिवारी मलिक यांनी म्हटलं की, केंद्र सरकार रेमेडिसीविरचा पुरवठा महाराष्ट्राला होऊ देत नाही. मलिकांना लगेचच केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. त्याला प्रतिसाद देताना मलिक यांनी बीडीआर फर्मास्युटिकल या कंपनीला दिलेले गुजरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे पत्र सादर केले. या पत्रात रेमेडिसीविर केवळ गुजरातमध्येच पुरवठा करण्याची बाब नमूद होती.

मात्र, तशाच आशयाचे पत्र महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभागानेही त्याच कंपनीला दिल्याचे समोर येताच याप्रकरणी मलिक यांनी केलेला दावा फोल ठरला आहे, असं मत भाजपाने व्यक्त केलं आहे.

Exit mobile version