Fri. Jan 28th, 2022

नवाब मलिक पत्रकार परिषद : मुन्ना यादव, हैदर आझम यांचा फडणवीसांसोबत काय संबंध?

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांचा दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप केला. यावर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर आरोप केले आहेत. मुन्ना यादव आणि हैदर आझम यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या संबंधावर मलिकांनी सवाल उपस्थित केला आहे.

  मुन्ना यादव यांच्यावर अनेक आरोप असताना दहशत निर्माण करणारा तुमचा मित्र कसा? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे. तसेच हैदर आझमला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष कसा बनवला? आणि नागपूरमधील कुख्यात गुंड मुन्ना यादव याला फडणवीसांनी कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष कसा बनवला? असे अनेक प्रश्न मलिकांनी उपस्थित केले आहेत.

 वरळीमध्ये २०० कोटींचे फ्लॅट कोणाच्या नावाने आहेत?, बीकेसीमध्ये कोणाचे फ्लॅट आहेत आणि तिथे कोण राहतात? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. आणि फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळातील बनावट नोटा प्रकरण एनआयएला का दिले जात नाही? तसेच संपूर्ण महाराष्ट्रात खंडणी उकळण्याचे काम सुरू होते की नाही? असे प्रश्न नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *