नवाब मलिकांनी ट्वीट केले एनसीबी अधिकाऱ्याचे निनावी पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काल मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर ट्वीट करत आरोप केले होते. त्यांची ट्विटची मालिका सुरूच असून त्यांनी आज पुन्हा एनसीबी अधिकाऱ्याचे निनावी पत्र ट्विट केले आहे. या पत्रामध्ये वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवाई बोगस असल्याचा दावा मलिकांनी केला आहे.
नवाब मलिकांनी ट्वीट केलेल्या पत्रात त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. एनसीबीच्या अज्ञात कर्मचाऱ्याकडून लिफाफा मिळाल्याबाबत मलिकांनी ट्विट केले. बोगस कारवाया करुन अनेक लोकांना तुरुंगात डांबल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. एनसीबीच्या महासंचालकांनी समीर वानखेडे यांची चौकशी करताना या पत्रातील आरोपांची दखल घ्यावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.