सात दिवसात पंतप्रधानपदाचा राजीनामा द्या; पाकमधील वकिलांचा नवाझ शरीफांना इशारा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणी संपण्याची चिन्हे नाहीत. पनामा पेपर्सप्रकरणी नवाझ शरीफ यांनी सात दिवसांत राजीनामा द्यावा अन्यथा देशभरात
तीव्र आंदोलन करु असा इशारा पाकमधील वकिलांनी दिला.
पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि लाहोर हायकोर्ट बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेने संयुक्त पत्रक काढले.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदावर राहणे अयोग्य आहे. त्यामुळे त्यांनी सात दिवसांत राजीनामा द्यावा अशी मागणी या पत्रकाद्वारे
करण्यात आली.