Sat. Aug 17th, 2019

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचं राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.  पनामा पेपर्सप्रकरणी शरीफ यांच्याबाबत पाकिस्तान सर्वोच्च न्यायालय निकाल

देणार आहे.

 

पनामा पेपर लीक झाल्यानंतर भारतातील अनेक दिग्गजांची देशाबाहेर संपत्ती असल्याचं उघड झालं होते. त्यात नवाझ शऱीफ यांचाही समावेश आहे.

 

पंतप्रधानपदी असताना शरीफ यांची लंडनमध्ये संपत्ती असल्याचा आरोप आहे. त्याच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयानं संयुक्त तपास पथक बनवलं होते.

 

या पथकाने शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस केली आहे. जर, शरीफ यात दोषी आढळले तर त्यांचं पंतप्रधान पद

जाण्याची शक्यता आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *