प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ‘नक्सलबारी’
‘नक्सलबारी’ ही वेबसिरीज ओटीटी माध्यमावर नुकतीच प्रदर्शित झाली…

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ची बहुप्रतीक्षित वेब सिरीज ‘नक्सलबारी’ला रसिक आणि समीक्षकांची पसंतीची पावती, राजीव खंडेलवाल यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘नक्सलबारी’ला आत्तापर्यंत ५० दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकसंख्या कोविड-१९ बहरात असताना वेब सिरीजचे गोवा येथे चित्रीकरण, ‘नक्सलबारी’च्या माध्यमातून ‘जीसिम्स’चा हिंदी निर्मितीक्षेत्रात प्रवेश बहुप्रतीक्षित अशी ‘नक्सलबारी’ ही वेबसिरीज ओटीटी माध्यमावर नुकतीच प्रदर्शित झाली आणि तिला सर्वच थरातून प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. समीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनीसुद्धा या वेब सिरीजला डोक्यावर घेतले असून अभिनय ते दिग्दर्शन आणि पटकथा ते सादरीकरण या सर्वच अंगांच्या बाबतीत या मालिकेवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. या मालिकेबद्दल आलेली परीक्षणे ही प्रोत्साहित करणारी आहेत.
‘नक्षलबारी’ला खिळवून ठेवणारी, लक्षवेधक,बेधडक, प्रभावी व्यक्तिरेखांनी बहरलेली अशा विशेषणांनी सर्वच भाषांमधील माध्यम समीक्षकांनी गौरविले आहे. या मालिकेच्या निर्मात्यांचे त्यांनी निवडलेल्या विषयासाठी तसेच या अत्यंत स्फोटक अशा विषयाला समंजसपणे हाताळल्याबद्दल समीक्षकांनी कौतुक केले आहे. आतापर्यंत ‘नक्षलबारी’ला ५० दशलक्ष एवढी प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे. ‘नक्षलबारी’ ही ‘झी5’वर नुकतीच प्रदर्शित झाली असून ती ‘जीसिम्स’ची पहिली निर्मिती आहे.‘जीसिम्स’ म्हणजेज‘ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मीडिया सोल्युशनस प्रायव्हेट लिमिटेड’ ही भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे.

चित्रपट, टेलिव्हिजन आणि वेब सिरीज निर्मिती व गुणवत्ता व्यवस्थापन आणि उपग्रह सामुहीकीकरण या क्षेत्रांमध्ये ती कार्यरत आहे. कंपनी आता नव्या जमान्याच्या कॉन्टेन्ट निर्मितीमध्ये ऊतरली आहे.‘समांतर’ ही मराठी वेब सिरीज सुपरहिट ठरल्यानंतर कंपनीने ‘नक्षलबारी’ची निर्मिती केली आहे.‘नक्षलबारी’चे चित्रीकरण कोविड-१९ साथरोग बहरात असताना केले गेले आहे. ही वेब सिरीज निर्मितीच्या सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. कोविड-१९ साथरोगाच्या टाळेबंदीमधून थोडीशी सूट सरकारने दिल्यानंतर लगेचच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. संपूर्ण मनोरंजन विश्वाने लॉकडाऊनमुळे कामावर स्थगिती दिली असताना अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या नेतृत्वाखालील ‘जीसिम्स’ने चित्रीकरणाला सुरुवात करायचे ठरवले. ठरल्या वेळेत मालिका प्रदर्शित करण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. या मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण गोवा येथे ‘एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा’च्या सहकार्याने करण्यात आले आहे.
‘नक्षलबारी’च्या निर्मात्यांनी हिंदी कॉन्टेन्ट निर्मितीमध्ये प्रवेश करून मनोरंजन क्षेत्राची त्याबाबतीतही वाहवा मिळवली आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातले निर्माते आणि अभिनेते हिंदी वेब सिरीजच्या क्षेत्रात कशाप्रकारे मुसंडी मारतात, ते सिद्ध करत त्यासाठीही ते कौतुकपात्र ठरलेआहेत. ‘नक्षलबारी’चे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक पार्थो मित्रा यांनी केले असून या मालिकेत राजीव खंडेलवाल हे मुख्य भूमिकेत आहेत. टीना दत्ता,श्रीजीता डे, शक्ती आनंद, आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा हे इतर आघाडीचे कलाकारसुद्धा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. पार्थो मित्रा हिंदी चित्रपट, टेलिव्हिजन आणि डिजिटल उद्योगक्षेत्रातील दर्जेदार दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे आघाडीचे नाव आहे.
बडे अच्छे लगते है, कसम से आणि इतना करो ना मुझे प्यार यांसारख्या लोकप्रिय भारतीय सोप ऑपेरा त्यांनी दिल्या आहेत. त्यांनी ‘कोई आप सा’ या हिंदी चित्रपटाचे आणि ‘हम’ या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांनी म्हटले, “या वेब सिरीजसाठी लोक एवढे वेडे झाले आहेत, हे पाहून आम्हाला मनापासून आनंद होत आहे. वेबसिरीजच्या क्षेत्रासाठी हा एकदम वेगळा असा विषय होता. लोकांनी या प्रयत्नाला उचलून धरले आहे, याचा आनंद आहे. जेव्हा कोविड-१९ साथरोग भारतात शिखरावर होता तेव्हा आम्ही या मालिकेचे चित्रीकरण केले, या बाबीसाठीही आम्हाला गौरविले गेले. आम्ही आमचे जीव धोख्यात घालून या मालिकेसाठी चित्रीकरण करत होतो. पण तसे करत असतानाही आम्ही आमच्या निर्मितीमूल्यांमध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. आम्ही तब्बल ११ कोटी रुपये या निर्मितीवर खर्च केले आणि ती भव्य प्रमाणात सादर होईल, याची काळजी घेतली. आम्ही ज्या कोणत्याही क्षेत्रात निर्मिती केली त्यात कथा दर्जेदार असेल, यावर आमचा नेहमीच कटाक्ष राहिला आहे. वेब सिरीजच्या क्षेत्रातील आमच्या प्रवेशाला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे. तरीही आम्ही मराठी चित्रपटांची निर्मिती कायम ठेवली आहे. ‘जीसिम्स’ लवकरच संपूर्ण नवीन अवतारातील ‘बळी-द व्हीक्टीम’ची निर्मिती करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया करत असून त्यात स्वप्निल जोशीची प्रमुख भूमिका आहे.”