Fri. Aug 6th, 2021

नक्षल्यांनी जाळली रस्त्याच्या कामावरील ३६ वाहनं!

राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी पुन्हा दहशतवादी कारवाई केली आहे. 30 एप्रिल रोजी रात्री सशस्त्र नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल 36 वाहनं जाळल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली.

पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 136 चे काम सुरु आहे.

हे काम दुर्ग येथील ‘अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी’द्वारे करण्यात येत आहे.

या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयंही आहेत.

शासनाविरोधात बॅनर्स

30 एप्रिलच्या रात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले.

त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधात मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली.

या आगीत 11 टिप्पर, डांबर पसरविणारी मशिन, डिझेल आणि पेट्रोल टँकर, मोठे रोलर अशी तब्बल 36 वाहनं, मोठे जनरेटर आणि दोन कार्यालयं जळाली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *