Sat. May 25th, 2019

नक्षलवाद्यांचा ‘हा’ कट उधळून लावण्यात यश!

44Shares

गडचिरोली जिल्ह्यातील मुरूमगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत नक्षल्यांनी आखलेला घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

हिरंगे नजीक असलेल्या पहाडीवर नक्षल्यांनी पेरून ठेवलेला बॉम्ब पोलिसांनी नष्ट केला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

CRPFच्या 113 व्या बटालियनचे जवान आणि जिल्हा पोलीस दलाचे जवान नक्षलविरोधी शोधमोहिम राबवत असताना त्यांना 2 किलो वजनाचे बॉम्ब आढळून आले. बॉम्ब दिसून येताच गडचिरोली येथील विशेष पथक बोलावून हे बॉम्ब निकामी करण्यात आले.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नक्षली मोठ्या प्रमाणात घातापाताच्या योजना आखत आहेत.

मागील काही दिवसांमध्ये दोन ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली.

तसंच दुर्गम भागात, बॅनर, पत्रके टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

जिल्ह्यात निवडणूक कालावधीत अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

यामुळे नक्षली कारवायांवर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *