Thu. Jan 27th, 2022

भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला, 5 जणांचा मृत्यू

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सभा बैठका सुरु आहेत.छत्तीसगढमधल्या दंतेवाडा येथे भाजपाची सभा संपली आणि भाजपा आमदार भीमा मांडवी यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे.याठिकाणी आईडी स्फोट घडवण्यात आला असून 5 जणांचा मृत्यु झाला आहे.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती.यानंतर जवानांनी सुरक्षेत आणि बंदोबस्तातही वाढ केली होती.तरीही दंतेवाडा या ठिकाणी हा हल्ला झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

मतदानाच्या तोंडावर छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी हल्ला केला.

दंतेवाडा येथे भाजप आमदाराच्या  ताफ्यावर हा हल्ला झाला आहे.
याठिकाणी  आईडी स्फोट घडवण्यात आला असून यामध्य 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

या हल्ल्यात भाजपचे आमदार भीमा मंडावी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे.

प्रचारसभा संपवून परत येत होताना माओवाद्यांनी स्फोट घडवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *