Fri. Jan 28th, 2022

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तौसिफ शेख शहीद, बीडवर शोककळा

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीमध्ये कुरखेडा मध्यरात्री दादापूर येथे तब्बल 36 वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी पुन्हा कुरखेड्यापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडवला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाले . खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. या घटनेने अख्या महाराष्ट्रावर आणि पोलीस विभागावर शोककळा पसरली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या हल्ल्यात  बीड जिल्ह्याचे पोलीस शिपाई तौसिफ आरिफ शेख हे शहीद झाले. यामुळे त्यांच्या कुटुंबासहित संपुर्ण बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

बीड जिल्ह्यावर शोककळा

नक्षलवाद्यांनी  जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंगस्फोट घडवला त्यात 15 जवान शहीद झाले आहेत.

तौसिफ आरिफ शेख  हे देखील या हल्ल्यात  शहीद झाले आहेत.

जवान तौफिक यांच्या जाण्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे.

शहीद जवान तौफिक यांच्या जाण्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे.

तौसिफ यांच्या जाण्याने कुटुंब पोरके

या हल्यात शहीद झालेले पोलीस शिपाई तौसिफ आरिफ शेख हे पाटोदा शहरातील क्रांतीनगरमधील रहिवाशी आहेत.

आरिफ शेख यांना 3 मुलं आहेत. यापैकी तौसिफ हे 2 नंबरचे होते.

हॉटेलवर काम करून आरिफ यांनी मुलांना शिकवलं. आजही ते हॉटेलमध्ये काम करतात.

मात्र, गरीब घरातील तौसिफ हे मोठ्या मेहनतीने 2009-10 च्या पोलीस भरतीमध्ये पोलीस दलात सहभागी झाले.

भरती झाल्यानंतर त्यांचा 2012 मध्ये विवाह झाला. त्यांना एक 5 वर्षाचा आणी दुसरा 3 वर्षांचा असे दोन मुलं आहेत.

पत्नी आणि मुलांना घेऊन तौसिफ हे गडचिरोलीत राहत होते.

तौफिक यांच्या अशा जाण्यावर त्यांचं संपूर्ण कुटुंब पोरकं झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *