Mon. Jul 22nd, 2019

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून 3 जणांची हत्या

0Shares

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी 3 ग्रामस्थांची निघृण हत्या केली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आली आहे.

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात ही घटना घडली आहे.

सोमवारी रात्री छत्तीसगडमधील सुमारे 150 दहशतवादी गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोसफुंडी फाट्याजवळील कसनासूर गावात गेले.

शस्त्रांचा धाक दाखवून त्यांनी ग्रामस्थांना गावाबाहेर काढले. यानंतर त्यांनी पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून 3 ग्रामस्थांची निर्घृणपणे हत्या केली.

मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी अशी या ग्रामस्थांची नावे आहेत. हत्येनंतर नक्षलवाद्यांनी गावात बॅनरही लावले.

या बॅनरवर म्हटले आहे की, 21 एप्रिल 2018 रोजी कसनूर- तुमिरगुण्डा येथे पोलिसांनी 40 नक्षलवाद्यांना मारले. या घटनेसाठी दोषी असलेल्या 3 ग्रामस्थांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे.

ते तिघेही पोलिसांचे खबरी म्हणून काम करत होते. 150 पैकी 70 नक्षलवादी हे गणवेशधारी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या घटनेमुळे लावण्यात आले बॅनर

  • भामरागड-एटापल्ली तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील बोरिया जंगलात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने 21 एप्रिल 2018 रोजी शोधमोहीम राबवली होती.
  • यादरम्यान नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला.
  • त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी चारही बाजूंनी घेरून नक्षलींवर गोळीबार केला.
  • या गोळीबारात 40 नक्षलवादी ठार झाले होते.
0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: