एनसीबीची ड्रग्ज तस्करीविरूद्ध कारवाई

मुंबईत एनसीबीने ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाई केली आहे. एनसीबीने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३.९८ किलो ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहे. तसेच याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला ताब्यात घेतले आहे. हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक बॅगेज ट्रॉलीमध्ये ड्रग्ज लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याच्याकडून एनसीबीने जवळपास ४ किलो वजनाचे हेरॉईन जप्त केली आहे.