Wed. Jul 28th, 2021

NCP चे नाराज जयदत्त क्षीरसागर यांचा BJP ला पाठिंबा!

राष्ट्रवादी काँग्रेसपासून चार हात दूर असलेले आ.जयदत्त क्षीरसागर यांनी आज बीड येथे मेळावा घेत आपली भूमिका जाहिर केली. ते गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आणि राजकारणापासून अलिप्त होते.

लोकसभा निवडणूका जाहिर झाल्यानंतरही त्यांनी कोणतीच भूमिका घेतली नव्हती, परंतु त्यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून लढ्याची केलेली भावनिक पोस्टमुळे पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

क्षीरसागर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागलेले असतांना, आज बीड येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत कोणत्याही पक्षात प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला.

मात्र आपली कुमक मात्र भाजपाच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी उभी करण्याचे दिशानिर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *