Sun. Nov 28th, 2021

अजित पवार यांच्या गिरीश महाजनांवरील टिकेवरून BJP NCPत जुंपली!

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नाशिकमधे राष्ट्रवादी आणि भाजपात चांगलीच जुंपली आहे. एकीकडे भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अजित पवारांबद्दल वादग्रस्त आशय असलेले फलक थेट राष्ट्रवादी भवन आणि संपूर्ण शहरात लावले. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील पोस्टर्स फाडत घोषणाबाजी केली

Article 370 रद्द झाल्यानंतर नाशिकमधे BJP च्या वतीनं जल्लोष करण्यात आला. यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनदेखिल उपस्थित होते. गिरीश महाजन यांनी यावेळी हातात तिरंगा ध्वज घेत ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला होता.

यानंतर अजित पवारांनी त्यांची ‘नाच्या’शी तुलना करत महाजनांनी पुरस्थितीकडे लक्ष द्यावं असं म्हटलं होतं. या वादाचे पडसाद नाशिकमध्येही दिसून आले. भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अक्षेपार्ह मजकुर असलेलं अजित पवारांचं पोस्टर थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयावर आणि शहरात लावलं.

यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनी हे बॅनर जाळत यावर असलेल्या मुकेश शहाणे यांच्या चित्रावर काळं फासत आपला विरोध दर्शवला.

एकीकडे भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधे बॅनर युद्ध सुरु असताना, दुसरीकडे पोलीसांनी आणि महापालिका प्रशासनानंही शहरातले बॅनर्स हटवण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात चौकशीनंतर गुन्हे दाखल केले जातील असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *