Tue. Oct 19th, 2021

झारखंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

झारखंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवारचा विजय झाला आहे. कमलेश कुमार सिंह (Kamlesh Kumar Singh) असे विजयी उमेदवाराचे नाव आहे.

राष्ट्रवादीचे कमलेश सिंह हे हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघातून (Hussainabad Assembaly Constituency)निवडून आले आहेत.

कमलेश कुमार सिंह यांनी आजसूच्या (AJSU) कुशावह मेहता (Kushwaha Mehta) यांचा 25 हजार 749 इतक्या मताधिक्याने पराभव केला.


कमलेश कुमार सिंह यांना एकूण 41 हजार 293 मतं मिळाली. तर कुशावह मेहता यांना 15 हजार 544 इतकी मतं मिळाली.

2018 साली कमलेश कुमार सिंह यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीच्या प्रदेक्षाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती.

झारखंड विधानसभा निवडणूक 2014

हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघातून 2014 साली कुशावह मेहता बसपच्या तिकीटावर निवडून आले होते. कुशावह मेहतांना 57 हजार 275 मतं मिळाली होती.

कुशावह मेहता यांनी एनसीपीच्या कमलेश सिंह यांचा 27 हजार 752 इतक्या मताधिक्याने पराभव केला होता.

एनसीपीच्या कमलेश सिंह यांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 29 हजार 523 मतं मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *