Tue. Oct 26th, 2021

राज्यसभेसाठी शरद पवार यांनी दाखल केला अर्ज

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. शरद पवारांनी विधानभवनात उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळेस शरद पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकासआघाडीचे मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.

रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील गुरुवारी राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्यसभेतील एकूण ५५ सदस्यांसाठी रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. ही द्विवार्षिक निवडणुकीसाठी २६ मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

या ५५ जागांपैकी राज्यसभा सभागृहातील महाराष्ट्रातील ७ जागा रिक्त होत आहेत.

या ७ खासदारांमध्ये शरद पवार, रामदास आठवले, माजिद मेमन, हुसेन दलवाई, राजकुमार धूत, अमर साबळे आणि संजय काकडे यांचा समावेश आहे.

६ मार्चला राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची १३ मार्च ही शेवटची तारीख असणार आहे.

तर १८ मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल.

राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी २६ मार्चला होणार निवडणूक

राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. तसेच राज्यसभेवर महाराष्ट्रातले एकूण १९ खासदार दिल्लीत नेतृत्व करतात.

राज्यसभा सभागृह कधीच विसर्जित होत नाही. राज्यसभेची एकूण २५० इतकी सदस्यसंख्या असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *