Mon. Jul 4th, 2022

“पक्षी फडफडायला लागला की समजायचं..” – धनंजय मुंडे

अजित पवार यांनी रविवारी मुंबईत पक्षाच्या नगरसेवकांच्या आकड्यावरुन विधान केलं होतं. अजित पवारांच्या या विधानावरुन आशिष शेलार यांनी टीका केली होती.

या टीकेला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युतर दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी आशिष शेलारांवर टीका केली आहे. याबाबतीत त्यांनी एक ट्विट केलं आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे ?

पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय, असं मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं आहे.

अजित पवार यांनी केलेल्या विधानावरुन आशिष शेलारांनी ट्विट करत टीका केली होती.

आशिष शेलार काय म्हणाले होते ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते म्हणतात 60 जागा जिंकू. तर दुसरे म्हणतात की 50 जागा जिंकू. राष्ट्रवादीने आहेत त्या 8 जागा टिकल्या तरी खूप झाले, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत?, आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं! तसेच पालिकेत यावेळेस भाजपचं सरकार येईल, अशा विश्वासही आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

नक्की प्रकरण काय आहे ?

राज्याचे उपमुख्यमंत्री रविवारी मुंबईतील चुनाभट्टीत एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी वक्तव्य केलं. मुंबई पालिकेत शिवसेना हा नंबर एकचा पक्ष असून एक नंबरच राहिला पाहिजे.

पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला पाहिजे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या ८ वरुन ६० वर गेली पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले. यासाठी कामाला लागण्याचे आदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.

अजित पवारांच्या या विधानावरुन विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे.

दरम्यान आमदार रोहित पवार यांनीही आशिष शेलारांचा चांगलाच समाचार घेतला.

भारतीय जनता पक्षाचे सुरवातीला दोन खासदार होते. केंद्रात फक्त तूमच्या पक्षासाठी आलेले “अच्छे दिन” हे तूमच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आहेत.

राज्यातले तुमच्या पक्षासाठी आलेले “बुरे दिन” हे अशाच अहंकाराचं फळ आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं. तसेच आशिष शेलार तुम्ही आतातरी सुधरा, असंही रोहित पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.