Wed. May 18th, 2022

नगरपंचायती निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

राज्यात आज निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळाली आहे. या नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी  काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकावर, भाजप दुसऱ्या क्रमांकावर, काँग्रेस तीसऱ्या क्रमांकावर, आणि शिवसेना  चौथ्या क्रमांकावर आहे.

२७ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय

२४ नगरपंचायतीवर भाजपचा विजय

२२ नगरपंचायतीवर काँग्रेसचा विजय

१७ नगरपंचायतीवर शिवसेनेचा विजय

राज्यातील एकूण १०६ नगरपंचायतीमधील ९७ नगरपंचायतीचे निकाल स्पष्ट झाले असून, उर्वरित ९ नगरपंचायतीचा निकाल गुरूवारी होणार आहे.

नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या विजयानंतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सांगलीतील कवठेमहाकाळमध्ये रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र कवटेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जळगावातील बोदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय होती. मात्र जळगाव बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. एकनाथ खडसेंना शिवसेनेने धोबीपछाड दिला आहे.

मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर निकाल हाती आले आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपा आणि महाविकास आघाडीला कोणाची ताकद किती याचा अंदाज येईल असं बोललं जात होतं. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल गुरुवारी जाहीर होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.